शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घराचे आर्थिक नुकसान

Foto
नगराध्यक्षा विद्या भूषण कावसानकर यांची घटनास्थळी भेट

पैठण, (प्रतिनिधी) : शहरातील इंदिरानगर येथील कडुबाई भगवान घुंगासे व आशा घुंगासे यांच्या राहत्या घराला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. 

या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा विद्या भूषण कावसानकर यांनी घटनास्थळी स्वतः भेट देऊन पाहणी केली. तात्काळ फायर ब्रिगेड गाडी पाठवून आग आटोक्यात आणली. या दुर्घटनामुळे पीडित घुंगासे कुटुंबीयांना धीर दिला. आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली घुंगासे कुटुंबीयांना शक्य ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन नगराध्यक्षा विद्या भूषण कावसानकर यांनी यावेळी दिले. 

या कठीण प्रसंगी घुंगासे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, त्यांना या संकटातून सावरण्या साठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.